

सोलापूर : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने डिसेंबर 2025 परीक्षेचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे.
ही परीक्षा 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर संगणक-आधारित चाचणी पद्धतीने घेतली जाईल.या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अर्ज दाखल करण्याची तसेच अर्ज शुल्क भरण्याची अंतिम दि.7 नोव्हेंबर आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करावा.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अर्जामध्ये काही त्रुटी किंवा चुका असल्यास त्या सुधारण्यासाठी 10 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत सुधारणा विंडो उपलब्ध असेल. उमेदवारांना त्यांच्या अर्जातील चुका दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी मिळेल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
परीक्षा केंद्रांची यादी परीक्षेच्या 10 दिवस आधी एनटीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल ही परीक्षा संपूर्ण देशभरात 85 विषयांसाठी कॉम्प्युटर बेस्ड पद्धतीने होईल. दोन पेपर एकाच सत्रात तीन तासांत होतील. यात 300 गुणांसाठी 150 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.