

सोलापूर : शहरातील विविध भागातून दोन तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. अलिजा अशपाक कल्याणी (वय 19, रा. सेंट्रल पार्क सोलापूर) ही तरुणी सात एप्रिल रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. कुटुंबियांनी सगळीकडे शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यानंतर वडील अशपाक कल्याणी यांनी जेलरोड पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
दुसऱ्या घटनेत नम्रता अंबादास दिड्डी (वय 18, रा. कोनापुरे चाळ, सोलापूर) ही तरुणी आठ एप्रिल रोजी संगमेश्वर कॉलेज येथे पेपर देण्यास गेली होती. पेपर झाल्यानंतर ती घरी परतली नाही. नातेवाईक व इतर ठिकाणी शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यानंतर आई नरसम्मा अंबादास दिड्डी यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.