Solapur Wall Collapse | वैरागमध्ये घराची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

जुनी, जीर्ण आणि धोकादायक घरे तसेच कमकुवत बांधकामांची पाहणी करून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज
Vairag Wall Collapse Two Women  Death
Vairag Wall Collapse Two Women Death Pudhari
Published on
Updated on

Vairag Wall Collapse Two Women Death

वैराग : वैराग शहरातील खेंदाड गल्ली येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास जुन्या व कमकुवत घराची भिंत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मीनल गुलाब ठोंबरे आणि सुमन महादेव पारदे अशी मृत महिलांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

खेंदाड गल्लीमध्ये जुने आणि जीर्ण झालेले घर आहे. मंगळवारी पहाटे अचानक या घराची भिंत कोसळली. भिंत कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही महिला भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आढळून आल्या.

Vairag Wall Collapse Two Women  Death
Solapur Mahavitaran Robbery | चिंचोलीतील महावितरण कार्यालयात चोरी; कर्मचाऱ्यावर दगडफेक, सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

नागरिकांनी तातडीने ढिगारा हटवून दोन्ही महिलांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी तत्काळ वैराग येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी बार्शी येथे हलविण्याची तयारी सुरू होती. दरम्यान, रुग्णालयात नेत असतानाच दोन्ही महिलांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमुल कादबाने, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कंगले, गणेश चव्हाण यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दुर्घटनेची माहिती घेतली.

Vairag Wall Collapse Two Women  Death
Solapur News : निवासी शाळांत शिक्षकांची वानवा

या घटनेनंतर खेंदाड गल्ली परिसरात शोककळा पसरली आहे. शहरातील जुनी, जीर्ण आणि धोकादायक घरे तसेच कमकुवत बांधकामांची पाहणी करून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. घटनेचा पुढील तपास वैराग पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news