

सोलापूर : नायलॉन मांजामुळे गळे कापल्याच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. यातच शुक्रवारी (दि.६) शहरातील शास्त्रीनगर परिसरात विद्युत तारांचा शॉक लागून दोघे भाऊ जखमी झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. यात रेहान बक्तियार फुलारी (वय १८) व अमन बक्तियार फुलारी (रा. 580, शास्त्रीनगर) अशी जखमींची नावे आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रेहान आणि अमन दोघेही घराच्या गच्चीवर पतंग उडवताना विद्युत तारेला स्पर्श होऊन दोघेही गंभीरित्या जखमी झाले. दोघांचे दोन्ही हात व पाठीला जखम झाली असून त्यांना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सिव्हील पोलिस चौकीत झाली आहे.