Karmala Crime | करमाळ्यात ठेकेदाराकडे खंडणी मागून हवेत गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

Solapur Crime News | पिस्तूल, पुंगळी, तलवार, गाडी जप्त
Karmala contractor threat case
दोघांना करमाळा पोलिसांनी अटक केली.(Pudhari Photo)
Published on
Updated on

Karmala contractor threat case

करमाळा: करमाळ्यातील शेटफळ येथे बांधकाम ठेकेदाराकडे खंडणी मागण्यासाठी पिस्तुलाने दोन राउंड गोळीबार करणारे दोघे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. बार्शी सत्र न्यायालयाने त्या दोघांना पोलीस कोठडी सुनावली. आरोपींकडून पिस्तूल, पिस्तुलाची रिकामी पुंगळी, तलवार, स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे.

जयर्वधन उर्फ मुन्ना हनुमंत दैन (वय २५, रा. वांगी नंबर १, ता. करमाळा, जि. सोलापूर) व प्रदीप मुकंद पोळ (वय २१, रा.शेटफळ, ता. करमाळा, जि सोलापूर) असे संशयित आरोपींची नावे आहेत.

अभयसिंह बाळासाहेब देशमुख (वय २८, रा. वांगी, नं. १, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली होती.

याबाबतची हकीगत अशी की, फिर्यादी अभयसिंह देशमुख हे रस्ते बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांचे चुलतभाऊ संकेत देशमुख व मावसभाऊ अमित घोगरे असे तिघे मिळून कामासाठी शेटफळ याठिकाणी जात होते . यावेळी कॅनॉलजवळ शेटफळ गावाचे हद्दीत संशयित आरोपी जयर्वधन उर्फ मुन्ना दैन व प्रदिप पोळ यांनी देशमुख यांची गाडी थांबवल . यावेळी आरोपी जयर्वधन याने देशमुख यांना शिवीगाळ करून पिस्टल काढून अभयसिंह याच्या कपाळाला लावून धमकी दिली. तसेच सोन्याची चैन हिसकावून घेऊन पिस्टल मधून दोन राऊंड फायर केला.

यानंतर दुसऱ्या दिवशीही २९ एप्रिलरोजी दुपारी साडेबारा वाजता अभयसिंह देशमुख यांचे वाहन चालक प्रतिक शंकर देशमुख हा अभयसिंह देशमुख यांच्या शेतात जात त्याच्यावर कोयत्याने पायाचे पंजावर व नडगीवर मारहाण करुन जखमी केले. दोन्ही संशयित आरोपींना बार्शी येथील सत्र न्यायालयासमोर उभा केले असता त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपटराव टिळेकर, पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पात्रे हवालदार अजित उबाळे, मनिष पवार, वैभव ठेंगल, तौफिक काझी, ज्ञानेश्वर घोगडे, सोमनाथ जगताप, अर्जुन गोसावी, गणेश शिंदे, योगेश येवले, मिलिंद दहीहंडे, रविराज गटकुळ, अमोल रंदील आदींनी तपास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news