Tuljapur Temple: तुळजापुरातील मंदिराच्या 1800 कोटींच्या विकास कामांना वेग

आ. पाटील यांची माहिती; वृद्ध, दिव्यांगांसाठी महाद्वारात बसविण्यात येणार मोठी लिफ्ट
Tuljabhavani
Tuljabhavani File Photo
Published on
Updated on

तुळजापूर : श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देतानाचा 108 फूट उंचीचा भव्य पुतळा, दिव्यांग, वृद्ध भाविकांसाठी मंदिराच्या मुख्य महाद्वाराजवळ मोठी लिफ्ट बसवून त्या माध्यमातून खाली उतरल्यावर भुयारी मार्गाने थेट मंदिराजवळ पोहोचता येईल, अशी विकास कामे तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

मंदिर परिसराच्या संभाव्य विकास आराखड्याला मूर्त स्वरूप देण्यात येत असून सुमारे 1800 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला आता गती मिळणार आहे. येत्या 15 दिवसांत सर्व संबंधित विभागांकडून कालबद्ध नियोजन प्रणाली सादर करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली.

केंद्रांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, भविष्यात महाद्वारातून थेट दर्शन मंडपात कसे पोहोचता येईल याचे नियोजन करण्यात येणार आहे. भौगोलिक अडचणी लक्षात घेऊन दर्शन मंडपाचे डिझाईन आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्याचेही आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

तुळजापूरचा कायापालट नाविन्यपूर्ण करताना जुन्या वास्तूंचेही जतन केले जाणार. पुढील 50 वर्षांचा दूरगामी विचार करून तो अर्बन प्लॅनिंगनुसार करण्याचा मानस आहे. यामध्ये भूमिगत सांडपाणी व्यवस्था, 24 तास पाणीपुरवठा, भूमिगत वीजवाहिन्या आदी सुविधा या मास्टर प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या. यासाठी विशेष तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे.
- आ. राणाजगजितसिंह पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news