

तुळजापूर : वर्षभर रात्रंदिवस शेतात राबराबून बळीराजासाठी धान्य पिकविणार्या बैलांचा सण बैलपोळा शुक्रवारी तुळजापूर शहर व ग्रामीण भागात उत्साहात साजरा झाला.
वर्षातील एकच आजचा दिवस बैलांना गोड-धोड खाऊ घालून त्यांची मनोभावे पूजा-अर्चा करण्यात येते.शिवाय त्यांना सजवून झुली पांघरून त्यांची मिरवणूक काढण्यात येते. अशाच एका खिलारी बैल जोडीचा आई तुळजा भवानी मातेच्या दरबारात थाटमाट अनुभवास आला. देवीचे महंत तुकोजीबुवा यांच्याकडे असलेल्या शेतीतील बैल जोडी थेट देवीच्या गाभार्यात मातेचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले.
यावेळी मंदिराचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. मंदिराच्या पायर्या उतरून भाविकांप्रमाणे थेट सिंह गाभार्यातून मातेच्या चांदीच्या सिंहासनाजवळ नेवून भिडविण्यात आले. यावेळी भाविकांसह सर्वांनी या बैलजोडीचे दर्शन घेतले.नंदी हे शिवशंकराचे वाहन आणि श्री तुळजाभवानी माता ही पार्वतीचे स्वरुप आहे.यासाठी बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना मंदिरात नेण्याची प्राचीन परंपरा आहे.