Tuljapur News: व्यावसायिकांच्या बंदमुळे भाविकांची तारांबळ

मंदिरात जाण्या-येण्याच्या मार्गात बदल केल्याचा निषेध
Tuljapur
TuljapurPudhari
Published on
Updated on

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात हाती घेण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या पार्श्वभूमीवर आज मंदिर समितीने भाविकांना मंदिरात जाण्या-येण्याच्या मार्गात बदल केल्याच्या कारणावरून शहरातील अर्ध्याहून अधिक व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून संस्थानच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला.

गेल्या एक महिन्यापासून नगर पालिका प्रशासनाने फुटपाथ अतिक्रमण मुक्त केल्यानंतर काही दिवस नाराजी नाट्य सुरु होते. त्यात पुन्हा आज बुधवारी मंदिर मार्गात बदल केल्याच्या कारणावरून सर्व व्यावसायिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. मंदिर समितीने राजे शहाजी महाद्वारातून केवळ ५०० रुपये दर्शन पासधारकांना प्रवेश निश्चित केला आणि २०० रुपये दर्शनपास घेवून देवीच्या मुख व धर्म दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना घाटशीळ पार्किंगकडील बीडकर पायरीकडून मंदिर प्रवेश सुरु केला.

याशिवाय मंदिरातील भाविकांची गर्दी मातंगी मंदिराकडील नेहमीचा मार्ग बंद करून सर्वांना टोळ भैरवाकडून बाहेर काढले जात होते. याचा परिणाम महाद्वार परिसर, भवानी रोड, महाद्वार ते आर्य चौक या मार्गावरील सर्व व्यवसाय थंड पडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news