सोलापुरात टोलनाक्यावरील बॅरिकेट तोडून ट्रकने सुपरवायझरला चिरडले

Solapur Accident News | पेनुर येथील टोलनाक्यावरील घटना
 Penur toll plaza supervisor killed
पेनुर (ता. मोहोळ) हद्दीतील टोलनाक्यावरील सुपरवायझरला टेम्पोखाली चिरडले.Pudhari Photo
Published on
Updated on

पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरहून मोहोळच्या दिशेने निघालेल्या आयशर मालवाहतूक टेम्पोने टोल न देता बॅरिकेट तोडून जाताना पेनुर (ता. मोहोळ) हद्दीतील टोलनाक्यावरील सुपरवायझरला टेम्पोखाली चिरडले. ही धक्कादायक घटना आज (दि.९) पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. या अपघाताची नोंद पंढरपूर पोलिसांत झाली आहे. हनुमंत (बिनु) अंकुश माने असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Solapur Accident News)

याबाबत पंढरपूर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ - पंढरपूर - आळंदी पालखी महामार्गावर पेनुर गावच्या हद्दीत टोलनाका आहे. त्या ठिकाणी हनुमंत अंकुश माने (वय ३८, रा. पेनूर, ता. मोहोळ) हा कर्मचारी रात्रपाळीला सुपरवायझर म्हणून काम करत होता. पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान एक आयशर टेम्पो पंढरपूरहून मोहोळच्या दिशेने बॅरिकेट तोडून टोल न देता निघालेला होता. (Solapur Accident News)

टोल नाका चुकविण्यासाठी वेगात जात असलेल्या आयशरने हनुमंत माने याला धडक दिली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तत्काळ टोल नाक्यावरील इतर सहकाऱ्यांनी माने याला पंढरपूर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबतची फिर्याद मृताचा भाऊ सिद्धेश्वर माने यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल शेजाळ करीत आहेत. मृत हनुमंत माने याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान या घटनेने पेनुर गावावर शोककळा पसरली आहे. (Solapur Accident News)

अपघातानंतर सदरील आयशर टेम्पो मोहोळच्या दिशेने गेला असून मोहोळ पोलीस स्टेशनचे अपघात पथक त्याचा शोध घेत आहेत. अपघातानंतर आयशर टेम्पो चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. मात्र अपघाताची घटना टोलनाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

 Penur toll plaza supervisor killed
हैदराबाद-सोलापूर राष्‍ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्‍यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news