

Trainee doctor ends life in Solapur
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
येथील शासकीय रुग्णालयातील डॉ. वैशंपायन शासकीय मेडिकल हॉस्पिटलमधील एका शिकाऊ डॉक्टराने हॉस्टेलच्या रूममध्ये जीवन संपवल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली. आदित्य नामबियर असे जीवन संपवलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयातील हॉस्टेल परिसरात शहर पोलिसांनी धाव घेतली. सदर घटनास्थळावर रुग्णालयातील डॉक्टरांनी मोठी गर्दी केली आहे. जीवन संपवल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी शिकाऊ डॉक्टराचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आला आहे. मृत आदित्य यांनी जीवन का संपवले याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
डॉ. शिरीष वळसंगकर यांचे जीवन संपवल्याचे प्रकरण ताजे असतानाच दुसऱ्या एका शिकाऊ डॉक्टरने जीवन संपवल्याचे प्रकरण समाेर आले आहे. आदित्य नमबियार असे जीवन संपवलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. डॉ. आदित्य नमबियार याचे नुकतेच एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केल्याची माहिती समाेर येत आहे. भाड्याने राहत असलेल्या रूममधील बाथरुममध्येच जीवन संपवल्याची घटना समाेर आली आहे. मात्र जीवन संपवण्याचे कारण अस्पष्ट असून पाेलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.