Sand excavation: तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

पाकणी येथे अवैध वाळू उपसा
Sand excavation: तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
Sand excavation: तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न file photo
Published on
Updated on

पाकणी : सीना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाने तलाठी व मंडल अधिकारी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.

महसूल विभागाचे पाकणी येथील तलाठी शुभम घोडके व कोंडी मंडल अधिकारी स्वामी हे या वाहनाचा पाठलाग करत होते. यावेळी ट्रॅक्टर चालकाने अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. 21) सकाळी 8.00 ते 8.15 च्या दरम्यान पाकणी येथे घडली. तलाठी व मंडलाधिकारी आपला जीव वाचवण्यासाठी दाट लोकवस्ती असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी आले असता त्यांचा पाठलाग करत ट्रॅक्टर चालकही वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन आला. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ट्रॅक्टर चालक गर्दीचा फायदा घेऊन ट्रॅक्टर सोडून फरार झाला. तालुका पोलिस ठाण्यात अमर हरिदास गुंड रा. शिवणी याच्यावरती गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रार करूनही कारवाईकडे दुर्लक्ष

पाकणी येथील सीना नदीतून मोठ्या प्रमाणात राजरोस अवैधरीत्या वाळूचा उपसा होत असल्याबाबत तक्रार पाकणीचे सरपंच बालाजी येलगुंडे यांनी यापूर्वीच दिली आहे. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, पोलिस निरीक्षक तालुका पोलिस ठाणे उत्तर सोलापूर, डीवायएसपी, तहसीलदार उत्तर सोलापूर यांना लेखी तक्रार दिलेली असतानाही संबंधितांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news