

माळीनगर; पुढारी वृत्तसेवा : माळीनगर या माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील सवतगव्हाण हद्दीत चांगदेव कुरूडकर यांच्या घरासमोरील नारळीच्या झाडावर गुरुवारी (दि. २०) सायंकाळी अचानकपणे वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला. नारळाच्या झाडावर जाळाने रौद्ररूप धारण केल्याने काहीकाळ परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळपासून थोडाफार उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत होता सायंकाळनंतर वातावरण अचानक बदल झाला सोसाट्याच्या वारा आणि पाऊसाला सुरूवात झाली त्याचबरोबर वीजांचा लखलखाट झाला यादरम्यान सवतगव्हाण येथे सदर घटना घडली. काल दिवसभर प्रचंड ऊन आणि उकाड्याने हैराण झालेल्या पशुपक्ष्यांना काहिसा दिलासा मिळाला मात्र फळबाग बागायतदार शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.