

सोलापूर : सोलापुरात सोमवारी (दि.24) एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनेत तिघांनी गळफास घेऊन जीवन संपविले. यामध्ये एक वृद्ध तर दोन तरुणांचा समावेश आहे. सुधीर विश्वनाथ शेंडगे (वय 69, रा. भारतीय चौक, सोलापूर) हे राहत्या घरी बेडरूमध्ये पहाटे पाचच्या सुमारास छताच्या फॅनला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
जेलरोड पोलिसांनी त्यांना नातेवाईकांच्या साहाय्याने खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वी ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसर्या घटनेत विजय सुनील गुंजोटे ( वय 29, रा. राघेवेंद्र नगर, जुना विडी घरकूल, सोलापूर) याने अज्ञात कारणावरून सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घरासमोरील झाडाच्या फांदीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. एमआयडीसी पोलिसांनी त्याला खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वी तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तिसर्या घटनेत मोहन अंबादास कारमपुरी (वय 26, रा. प्रियदर्शनी नगर, जुना विडी घरकूल, सोलापूर) याने सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून राहत्या घरी फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. एमआयडीसी पोलिसांनी नातेवाईकांच्या साहाय्याने खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वी तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या तीनही घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.