

सोलापूर : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेच्या माध्यमातून पुण्यातील मुळा, मुठा या दोन्ही नद्या स्वच्छ होणार आहेत. उजनी धरणात स्वच्छ पाणी येणार असल्याने भीमा नदी स्वच्छ पाण्याने वाहणार आहे. नदी संवर्धन योजनेतून 990 कोटी रुपये निधीस 2016 मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यात केंद्र शासनाचा 841 कोटी 72 लाख रुपये, तर राज्य शासनाचा 148 कोटी 43 लाख रुपयाचा हिस्सा असणार आहे. त्यापैकी 50 कोटी रुपये वितरण करण्यात आले आहे.
मुळा, मुठा या दोन्ही नद्या प्रदुषित असून, या दोन्ही नद्यामुळे भीमा नदी प्रदुषित झाली आहे. मात्र आता या दोन्ही नद्या स्वच्छ होणार असल्याने भीमा नदी स्वच्छ पाण्याने वाहणार आहे. तसेच सोलापूर शहरात उजनी धरणातून होणारे प्रदूषित पाण्यामुळे कॅन्सरसारखे आजाराला देखील आळा बसणार आहे. या प्रकल्पातील एकूण प्रस्ताव रकमेच्या 85 टक्के हिस्सा म्हणजे 841 कोटी 72 लाख हा केंद्र शासनाचा व उर्वरित 15 टक्के हिस्सा म्हणजे 148 कोटी 53 लाख रुपये हा पुणे महानगरपालिकेचा आहे. यानुषंगाने आतापर्यंत केंद्र शासनाकडून प्राप्त रुपये 300 कोटी 45 कोटी इतका निधी राज्य शासनास मार्फत पुणे महानगरपालिकेस वितरित करण्यात आला आहे. पुन्हा 26 नोव्हेंबर रोजी मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी केंद्र शासनाने.50 कोटी दिल्याने तो निधी वर्ग करण्यास राज्य शासनाने नुकतेच 26 नोव्हेंबर 2024 रोजी मंजुरी दिली आहे.
उजनी धरणातून सोलापूर शहरासह भीमा नदीकाठचे गावे, सांगोला, पंढरपूर शहरे आणि सीना नदी काठातील गावांना पिण्यासह शेतीसाठी पाणीपूरवठा होते. मुळा व मुठा नदीतील पाणी उजनी धरणात येऊन मिसळते. पुण्यातील सांडपाणी मुळा मुठा नदीत येऊन मिसळते. मध्यतंरी सोलापूर विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून उजनीतील पाण्याने आरोग्याचे समस्या निर्माण होत असल्याचे समोर आले. त्यामुळे उजनीतील पाणी आरोग्याला हानीकारक बनत असल्याने उजनीतील पाणी स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे.