तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना ठाण्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू

Solapur Accident : पेनुर येथील पालखी महामार्गावरील घटना
Solapur Accident News
तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना ठाण्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
Published on
Updated on

पोखरापूर : कल्याण ते पंढरपूर मार्गे तुळजापुरला दर्शनासाठी जात असताना पुलावरील सिमेंटच्या कठड्याला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१५) सायंकाळी ५.३० च्या सुमारास मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील पालखी महामार्गावर घडली. सुरेश थेरू चेल्लम (रा. कल्याण जि.ठाणे) असे अपघातातील मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सुरेश चेल्लम हे दुचाकी क्र. (एम. एन.०५,एफ एफ.८०९१) वरून शनिवारी पहाटे तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे तीन मित्र आपापल्या दुचाकीवरून आले होते. दरम्यान ते आपल्या मित्रांपेक्षा भरधाव वेगात दुचाकीवरून लोणावळा मार्गे शिरवळ, फलटण, पंढरपुर मार्गे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील पुलावर आले. यादरम्यान त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी पुलावरील सिमेंटच्या कठड्याला धडकली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पालखी महामार्ग रुग्णवाहिकेतून मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news