Solapur News: तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेने जीवन संवपले

खुळेवाडी येथील घटना; पतीसह सासू, सासरा, दिराला अटक
Solapur News
Solapur News: तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेने जीवन संवपलेPudhari
Published on
Updated on

नातेपुते : सासरकडील मंडळींकडून शारीरिक, मानसिक त्रास होत असल्याने 22 वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले. ही हृदयद्रावक घटना रविवार, दि. 22 रोजी उघडकीस आली. पायल शशिकांत रणदिवे (रा. खुळेवाडी, ता. माळशिरस) असे तिचे नाव आहे. ब्युटी पार्लर बंद करण्यासाठी सासरकडील लोकांकडून त्रास होत होता, असे तिने मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

याप्रकरणी पती शशिकांत मारुती रणदिवे, सासू छाया मारुती रणदिवे, सासरा मारुती दामू रणदिवे व दीर कैलास मारुती रणदिवे यांना पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान, गुन्हा दाखल करण्यापूर्वी नातेवाईकांनी पायलचा मृतदेह नातेपुते पोलीस ठाण्यात आणला. नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरच तिच्या माहेरच्यांनी तिचा मृतदेह घरी नेला. याबाबत अंकुश रामचंद्र लोंढे (रा. बाबरीपुल महाळुंग ता. माळशिरस) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सपोनि वायकर हे करीत आहेत.

ही आत्महत्या नाही, तर हत्या, माहेरच्यांचा दावा

पायलला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता, असा आरोप तिच्या माहेच्या लोकांनी केला आहे. पायलच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे ही आत्महत्या नाही तर ही हत्या असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. तसेच सुसाइड नोटमध्ये तिने कोणाचेही नाव लिहले नाही. कोणताही ब्लेम केला नाही. पण तिचा रोख तिच्या सासरच्या लोकांकडे आहे, असा दावा तिच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांकडे केला आहे.

हसू झालं गं माझं.... माझं पार्लर बंद केलं. जीव होता तो माझा....स्वप्न होतं गं...

पायलने मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावर बॉलपेनने स्वहस्ताक्षरात सुसाईड नोटमध्ये लिहिले की, हसू झालं गं माझं. माझं पार्लर बंद केलं. जीव होता तो माझा. स्वप्न होतं गं. आजपर्यंत शांत बसले. पण आता नाही. चांगल्या आई-बापाची लेक आहे. म्हणून निघून पण नाही गेले. माझ्यामुळे त्रास झाला, त्यासाठी माफी मागते. सॉरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news