CTET Exam Election Duty Relief| सी-टीईटी परीक्षेमुळे शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट

राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय
CTET Exam Election Duty Relief
CTET Exam Election Duty ReliefPudhari
Published on
Updated on

कासेगाव : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश आयोगाने सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर १२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार आता ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, याच कालावधीत राज्यातील अनेक शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा नियोजित असल्याने त्यांना निवडणूक कामकाजात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देऊन त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रशासनालाही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news