मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी आम्ही तयार : खा. सुप्रिया सुळे

प्रस्ताव आणा, आम्ही सोबत राहू, अस्वस्थता वाढवण्याचे पाप खोके सरकारने केले
Supriya Sule said we are ready for the discussion of Maratha reservation
खासदार सुप्रिया सुळेPudhari File Photo
Published on
Updated on

सोलापूर : मराठासह धनगर, लिंगायत, भटक्या विमुक्त, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. तुम्ही प्रस्ताव आणा. जे कोणी सरकार असेल आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू. संविधानमध्ये तरतूद करून विधेयक आणल्यास आमची सहकार्याची भूमिका राहील. आरक्षणाबाबत आज प्रचंड अस्वस्थता आहे. ते वाढवण्याचे पाप राज्यातील निष्क्रीय ट्रिपल इंजिन खोके सरकारने केले आहे. त्यांच्या कोणत्याही निर्णयात सातत्यता नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सुप्रिया सुळे सोलापुरात

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त त्या सोलापुरात आल्या असताना पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, सध्या आरक्षणाबाबत समाजाच्या रोषाला राज्यसरकार जबाबदार आहे. आरक्षणाबाबत चर्चा करून मार्ग काढण्याची तयारी आहे. गेल्या 10 वर्षापासून अनेकवेळा संसदेत आवाज उठविला होता. यासाठी संविधानात काय तरतूद करता येईल का हे बघावे लागेल असेही त्यांनी सांगितले.

आयटीची नोटिस सदानंद सुळेंना नेहमीच येते

आयटीची नोटिस सदानंद सुळे यांना नेहमीच येते. याची आम्हाला सवय झाली आहे. त्याला आम्ही उत्तर देतो. त्यानंतर ती फाईल बंद होते. कितीवेळा नोटिस आली याचा डेटा काढण्यास सदानंद सुळे यांना सांगितले आहे. माहिती आल्यानंतर सोशल मिडीयावर शेअर करणार असेल्याचेही सुळे म्हणाल्या.

राज्यात महागाई, भ्रष्टाचार वाढला

देशासह महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला आहे. हा आमचा आरोप नसून डेटा सांगतोय. महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे, मात्र विकास होत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news