Wife Murder Case | संसाराचा 'कोयत्याने' शेवट! ऊस तोड मजुराने वार करून पत्नीला संपवले

गोपाळपूर येथील घटना : दोन तासातच पंढरपूर तालुका पोलिसांनी पतीला केली अटक
Wife Murder Case
पंढरपूर : खून प्रकरणातील अटक केलेल्या आरोपीसह पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर व टीम.File photo
Published on
Updated on

पंढरपूर : घरगुती कारणावरुन ऊस तोड मजूर असलेल्या पतीने पत्नीचा ऊस तोडीच्या कोयत्याने गळ्यावर, मानेवर सपासप वार करुन खून केला. ही घटना बुधवार, दि.4 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वा. च्या दरम्यान, गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या शिवारात घडली आहे. लक्ष्मी भानुदास वाघ (वय 35) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पंढरपूर तालुका पोलीसांनी भानुदास आनंदा वाघ (वय 45, रा. दरेगाव ता. चाळीसगाव जिल्हा जळगाव) ) या पतीस अटक केली आहे.

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे मागील दहा दिवसांपूर्वी स्वेरी कॉलेजच्या पाठीमागे ऊस तोडणीसाठी जळगाव येथील तीन ते चार टोळ्या आलेल्या आहेत. त्यामध्ये भानुदास वाघ हा ऊसतोड कामगार पत्नी व दोन मुलासह राहत होता. दि. 4 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता च्या सुमारास भानुदासने पत्नी लक्ष्मी हिला घरगुती भांडणाच्या कारणावरून ऊस तोडीच्या कोयत्याने गळ्यावर मानेवर वार करून जिवे ठार मारले आहे.

या घटनेची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना कळवली. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक मुजावर, पीएसआय वडने, भारत भोसले, एपीआय रेळेकर व टीम घटनास्थळी रवाना झाली. आरोपीला अटक केली.

आरोपी विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सपोनि विभावरी रेळेकर, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, भारत भोसले, पोलीस विजय गायकवाड, हवालदार सतीश चंदनशिवे, पोलीस हवालदार साळुंखे, बाजीराव काकडे, अभिमन्यू गरड, पो. कॉ.हजारे, संजय गुटाळ, सुहास देशमुख, विजय आवटी, सागर गवळी यांच्या पथकाने केली आहे.

शिताफीने आरोपीस पकडले

आरोपी हा रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन उसाच्या फडाच्या मागून पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच्या जवळ मोबाईल देखील नव्हता. तरी देखील पोलीसांनी स्वेरी कॉलेजच्या पाठीमागील परिसरात शोध घेऊन दोन तासांमध्ये आरोपी भानुदास वाघ यास सीताफीने ताब्यात घेतले. अटक करुन आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news