

सोलापूर : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत आहे. त्यामध्ये आता बदल करण्यात आले असून, जिल्ह्यातील चार लाख 62 हजार विद्यार्थ्यांना आता मुगदाळ खिचडी आणि चणा पुलाव मिळणार आहे. त्याचा लाख विद्यार्थ्यांना होणार आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना शेवगा वरण भात, सोयाबीन पुलाव, मोड आलेली मटकी उसळ यातील प्रत्येक पदार्थ दोन, दोन दिवस देण्यात येत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात थंडी वाढल्यामुळे मुगदाळ खिचडी आणि चणा पुलाव देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पौष्टीक पोषण आहार खाण्यासाठी मिळणार आहे.
शिक्षण विभागाकडून आतापर्यंत पोषण आहारात शेवगा वारण भात, सोयाबीन पुलाव, मटकी उसळ आणि वटाणा भात देण्यात येत होते. मात्र, वटाणा भात खाताचा बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणीत येत असल्याच्या तक्रारी तालुकास्तरावरुन प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे वटाणा भात आहार रद्द करुन आता मटकी उसळ आणि मुगदाळ खिचडीचा समावेश करण्यात असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.