

सोलापूर : शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पोलिस आयुक्तलयात भेट देऊन पोलिसींगचे धडे घेतले. पोलिस डे, डायल 112, सायबर गुन्हे, पोलिसांचे काम, बॅण्डपथक, शस्त्रे याची माहिती देण्यात आली.
दोन जानेवारी हा पोलिस रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. शहरातील के. एल. ई. इंग्लिश मीडियम स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल तसेच कॅम्प हायस्कूल चे विद्यार्थी उपस्थित होते. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उपायुक्त गौहर हसन, विजय कबाडे, डॉ. आश्विनी पाटील, स. पोलिस आयुक्त राजन माने, सुधीर खिरडकर, विजयालक्ष्मी कुर्री, दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोनि अरविंद माने, सायबर सेलचे वपोनि निरीक्षक श्रीशैल गजा, विशेष शाखेचे पोनि धनाजी शिंगाडे आदी उपस्थित होते.
सपोनि स्वाती येळे, पोलिस उपनिरीक्षक आश्विनी काळे, शीतल माने, सीमा खोगरे, सरस्वती घाडगे, इंदिरा राठोड, कविता डांगे, नसीमा शेख, नीलम माळवे, अरूणा परब, सविता म्हेत्रे, उषा मळगे उपस्थित होते.