Fraud Case: गुंतवणूक करून परताव्याचे आमिष; 85 लाखांची फसवणूक

जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 85 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली
Fraud Case
Fraud(Pudhari Photo)
Published on
Updated on

सोलापूर : फायनान्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यामधून जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 85 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली. सख्ख्या भावाने बहीण आणि तिच्या सासऱ्यांना फसवले. तसेच तिसऱ्या व्यक्तीकडूनही पैसे घेतल्याचे उघड झाले आहे. सचिन नामदेव भडंगे (वय 47, रा. शिवगंगा मंदिर शेजारी, भवानी पेठ, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पूनम धनंजय ढवळे (वय 40, रा. होमकरनगर, भवानी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. सचिन भडंगे यांनी बहीण पूनम ढवळे यांचे सासरे शामसुंदर ढवळे यांना साईराज फायनान्समध्ये गुंतवणूक करा त्याबदल्यात 12 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे शामसुंदर ढवळे यांनी 2018 ते 2021 दरम्यान वेळोवळी मिळून 79 लाख 78 हजार रुपये सचिन भडंगे यांना रोख तसेच बँकेव्दारे दिली. सुरुवातील सचिन भडंगे याने 10 ते 15 हप्ते परतावा दिला. परंतु त्यानंतर परतावा देण्ो बंद केले.

तसेच नरेंद्र मोहनराव चव्हाण यांच्याकडून सहा लाख रुपये घेऊन त्यांनाही परतावा दिला नाही. वेळोवेळी मागणी करुनही सचिन याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. याबाबत पूनम ढवळे यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रारी अर्ज दिला. त्यानंतर शहर गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.13) जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पेटकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news