Navratri 2024 : नवरात्रोत्सवासाठी सोलापुरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

दामिनी पथक आणि ४५ ठिकाणी फिक्स पॉइंट
Strict police security in Solapur for Navratri festival
नवरात्रोत्सवासाठी सोलापुरात कडेकोट पोलिस बंदोबस्तFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

शारदीय नवरात्र महोत्सवाला गुरुवार (दि.३) पासून सुरुवात होत आहे. नऊ दिवसांच्या उत्सवामध्ये गुरुवारी दुपारी शहरात शक्ती देवी प्रतिष्ठापना मिरवणुक निघणार आहेत. नवरात्र उत्सवात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राहावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रूपाभवानी चौकापासून १०० मीटर पर्यंत 'नो पार्किंग झोन' असेल. (दि.३ ते १२) ऑक्टोबरच्या विजयादशमीपर्यंत ही यंत्रणा कार्यरत राहील असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. (Navratri 2024)

दरम्यान, नवरात्र महोत्सव अनुषंगाने शहरात ४५ ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. तसेच देवी मंदिरास बंदोबस्त दिला आहे. ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नाकाबंदी व पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात आले आहे. तसेच पहाटेच्या वेळी भावीक रूपाभवानी मंदिरकडे पायी चालत जातात. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून दामिनी पथक पेट्रोलिंग करणार आहेत. तसेच वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक शाखेकडील पोलीस कर्मचारी देखील तैनात असणार आहेत.

घटस्थापनेचा बंदोबस्त असेल विजयादशमीपर्यंत

३ पोलीस उपायुक्त, ५ सहायक पोलीस आयुक्त, १२ पोलीस निरीक्षक, ४८ सहायक पोलीस निरीक्षक, ८७० पोलीस अंमलदार, ७०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड, १ एसआरपीएफ तुकडी, ४५ फिक्स पॉईंट.

रूपाभवानी मंदिराकडे जाणारे पाच रस्ते बंद केल्यानंतर त्या मार्गावरील वाहनांसाठी पोलिस आयुक्तांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. मड्डी वस्तीकडून घोंगडे वस्ती-कुंभार वेसमार्गे बलिदान चौक व पुढे कस्तुरबा मार्केटमार्गे सम्राट चौक आणि सम्राट चौकाकडून जुना कारंबा नाका-तुळजापूर नाकामार्गे मड्डी वस्ती हा मार्ग वाहनांसाठी उपलब्ध असणार आहेत.

‘हे’ मार्ग राहणार बंद

सम्राट चौक ते रूपाभवानी चौक, मड्डी वस्ती क्रॉस रोड ते रूपाभवानी चौक. बलिदान चौक ते रूपाभवानी चौक. हैदराबाद रोड ते रूपाभवानी चौक. रूपाभवानी चौकाचा १०० मीटर परिसर ‘नो पार्किंग झोन’ राहणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news