माजी आमदार आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्‍याचा आराेप, परिसरात तणाव
stone pelting on Former MLA Adam Master's house
माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेकFile Photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

बापूजी नगर येथे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कुरमेश बुगले विशाल बुगले, गणेश म्हेत्रे व अन्य कार्यकर्त्यांकडून ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यावेळी ते घरात नव्हते. त्यामुळे सभोवतालच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असा आरोप माकपचे कार्यकर्ते ॲड. अनिल वासम यांनी केला आहे.

या भागातील नगरसेविका कामिनी आडम यांनी फोनवर कळविले असता, अनिल वासम हे तात्काळ आडम मास्तर यांच्या घराजवळ तात्काळ पोहोचले. त्यावेळी येथे प्रचंड गोंधळ व बाचाबाची चालली होती. त्यावेळी यल्लप्पा भंडारी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केले. मात्र ते आक्रमकपणे या ठिकाणी गोंधळ करत होते. अनिल वासम यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.

112 वर पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांचा ताफा तिथे आला. दरम्यान आमचे नेते आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक केली अशी विचारणा केली असता, धक्काबुक्की झाली. त्यामुळे माकपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तणाव वाढला. सदरची हकीकत सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी भ्रमणध्वनी द्वारा कळविण्यात आली. त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे साहेब यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांचा ताफा पाठवून वातावरण काबूत आणले. त्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे काम सुरू केले. त्यावर जेष्ठ नेते मास्तर यांना ही बाब समजताच ते प्रचंड संतापले. माझ्या जीवाला धोका असून समाजामध्ये असे उपद्रव करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्‍यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news