पेटची परीक्षा महिन्याअखेरीस होणार

एमपीएससी परीक्षेमुळे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलली
Solapur University
Solapur UniversityPudhari File Photo

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पेट नऊची परीक्षा 21 जुलैला होणार होती. मात्र याचदिवशी एमपीएससीची परीक्षा असल्यामुळे आता ही परीक्षा 30 जुलैला होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना दोन विषयात पेटची परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी 31 जुलैला परीक्षा होईल. पेट नऊसाठी अर्ज करण्यास सहा जुलैची मुदत होती. ती मुदत 22 जुलैपर्यंत वाढवून दिल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

विद्यापीठाच्या पेट परीक्षेसाठी एकूण 474 जागांसाठी पेट नऊ परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी 13 जूनपासून अर्ज करण्याची लिंक खुली झाली आहे. विद्यापीठाच्या संकेत स्थळावरुन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. विद्यापीठाच्या पेट नऊसाठी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान, अर्ज भरण्यास आणखी मुदतवाढ मिळाल्यामुळे यात वाढ होण्याची शक्यता आहे तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यासाठी वेळही मिळाला आहे.

Solapur University
सोलापूर विद्यापीठ पदवी-पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्जास प्रारंभ

पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा पुढे ढकलली

सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी. कोर्स वर्कची परीक्षा ही आठ, 10, 12 जुलैला होणार होती; मात्र आषाढी वारीमुळे बर्‍याच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएच.डी. कोर्स वर्कची परीक्षा ही 22, 24 आणि 26 जुलैला होईल, असेही अंधारे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news