

सोलापूर : ग्रामीण पोलिसांनी पकडलेले चार आंतरराज्य आरोपी विमानाने दिल्लीला जाऊन तेथील दोघांकडून चोरीच्या अलिशान कार खरेदी करीत. त्या गाडीचे इंजीन आणि चेसी नंबर बदलून त्या महाराष्ट्रात विक्री करीत. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना मुळेगाव तांडा येथे पकडले.
अजीम सलीमखान पठाण (वय 36 रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा), प्रमोद सुनील वायदंडे (वय 26, रा.रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा), फिरोज शिराज मोहम्मद (वय 35, रा. आर टी नगर, डी मार्ट जवळ, बंगळुरु, कर्नाटक) आणि इरशाद सफिउल्ल सय्यद (वय 34, रा. मुलबागल, कोलार, कर्नाटक) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते विमानाने दिल्ली येथे जात. तेथून चोरीच्या अलिशान कार आणून त्या महाराष्ट्रात विकत होते. त्यांच्या ताब्यातून 1 टोयोटा कंपनीची फॉरच्युनर, 3 हुंडाई कंपनीच्या के्रटा, 1 मारुती सुझुकी कंपनीची ब्रिजा अशा 5 अलिशान कार व मोबाईल हॅन्डसेट मिळून 83 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या सराईत आरोपींनी महाराष्ट्रात किती चोरीची वाहने विक्री केली आहेत, याचा पुढील तपास पोलिसांनी सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक विशाल वायकर, भिमगोंडा पाटील, नीलकंठ जाधवर, सलीम बागवान, विजयकुमार भरले, शशिकांत कोळेकर, पल्लवी इंगळे, सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव, यश देवकते, समर्थ गाजरे, बाळराजे घाडगे, दिलीप थोरात, व्यंकटेश मोरे आदींनी पार पाडली.
असा झाला उलगडा
सदर वाहन व वाहनातील इसम याबाबत शंका आल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांनी वाहनाची झडती घेतली. त्या वाहनाचा चेसी नंबर व इंजीन नंबर प्रिंट असणारी व वाहनातील इसम याबाबत शंका आल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांनी वाहनाची झडती घेतली. त्या वाहनाचा चेसी नंबर व इंजीन नंबर प्रिंट असणारी पट्टी काढली असल्याचे दिसले. चेसी घासून त्यावर नवीन इंजीन क्रमांक प्रिंट केला होता. त्यानंतर पाटील यांनी एम.एच. 45 ए.डब्ल्यू. 5577 या क्रमांकाच्या गाडीची माहिती घेतली. त्या गाडीच्या मालकाने गाडी आपल्या जवळ असल्याचे सांगितले आणि या चोरीच्या गाडीचा उलगडा झाला.
आरटीओचे बनावट रजिस्टर स्मार्ट कार्ड
आरोपी हे महाराष्ट्रातून दिल्लीला विमानाने जात असत. तेथील हफिज (रा. मेरठ दिल्ली) व लखविंदर सिंग (रा. रायपूर) यांच्याकडून चोरीची वाहने घेत. ती महाराष्ट्रात आणून त्याचे मूळ इंजीन व चेसी नंबर काढून त्याठिकाणी चोरीच्या कारच्या मॉडेलप्रमाणे बनावट इंजिन व चेसी नंबर बसवत. त्यानंतर आरटीओचे बनावट रजिस्टर स्मार्ट कार्ड तयार करून त्या कार महाराष्ट्रात विक्री करत.
आरोपी सराईत गुन्हेगार, विविध राज्यात गुन्हे दाखल
यातील आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. अजीम सलीम पठाण व दिल्लीतील हफिज याच्यावर सातारा, सांगली, पिंपरी चिंचवड, दिल्लीतील मुखर्जीनगर, हरीनगर, मोर्या, राणीबाग, शाकरपूर, बिसरस, मॉडल टाउन, सुभाष प्लेस पोलिस ठाणे, मध्यप्रदेशातील शिवपुरी तसेच कर्नाटकातील आरसीकेअर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सोलापूर : चोरी केलेल्या कार व आरोपींसह ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गुन्हे शाखेचे पथक.