

माळशिरस : निरा देवधर प्रकल्पाच्या हक्काच्या पाण्यासाठी योजनेपासून वंचित 22 गावे पाण्यावाचून होरपळत आहेत. या पाण्यासाठी वेळोवेळी निवेदने दिली, मोर्चे काढले, आंदोलने केली. मात्र, सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि अधिकारी बहिरे आहेत. 22 गावातील जनतेचे हाल थांबवा अन्यथा टोळ्याची भूमिका घेऊ, असा इशारा खा. मोहिते-पाटील यांनी दिला तर आमदार उत्तमराव जानकरांनी 50 दिवसाचा अल्टमेट दिला. अन्यथा मंत्रालयावर मार्चा काढण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 22 गावांना निरा देवधरचे पाणी मिळण्यासाठी आमदार जानकर, खा. मोहिते पाटील यांचा गारवाड पाटी येथे रास्ता रोको आदोलन करण्यात आले. यावेळी खा. मोहिते-पाटील व आ. जानकर बोलत होते.
यावेळी गौतम माने, मच्छिंद्र ठवरे, पाडुरंग वाघमोडे, रमेश पाटील, निरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष जयराम राणे, डॉ. मारुती पाटील, बाबासाहेब माने, सुरेश टेळे, संग्रामसिंह जहागिरदार, तुकाराम देशमुख, लक्ष्मण पवार, राहुल वाघमोडे, नगरसेवक रघुनाथ चव्हाण, कैलास वामन, काका घुले, गोरख देशमुख, दादासाहेब वाघमोडे, बाजीराव माने, विष्णू गोरड, बाळासाहेब कर्णवर, मधुकर पाटील, आबा रणनवरे, अनिल सावंत, साहिल आतार, आदींसह महिला वर्ग, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. मोहिते पाटील म्हणाले की, या निरा देवधर धरणाच्या पाण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. 15 वेळा पत्र व्यवहार केला आहे. ते पत्र त्यांनी आदोलनकर्यांना दाखविले. अधिकारी हे एकमेकांवर ढकलतात. लोकसभेच्या वेळी टेंडर काढले होते. पाच वर्ष वाट पाहिली. आता येणार्या लोकसभेच्या निवडणूकीपर्यत वाट पाहावी लागेल. परत टेंडर काढतील. सरकार अधिकारी बहिरे आहेत. परंतु, आम्ही 22 गावाच्या शिवारात पाणी खेळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. टोकाची भुमिका घेऊ, असे सांगून आमच्यावर टिका वारंवार केली जात आहे. याचा समाचार जि. प. च्या निवडणूकीत घेवू, असे खा . मोहिते पाटील यांनी सांगितले.
यावेळी समितीचे अध्यक्ष जयराम राणे, पाडुरंग वाघमोडे, आप्पासाहेब कर्चे, बाबासाहेब माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी निवेदन मंडल अधिकारी व निरा देवधरचे कार्यकारी अभियंता कुरूडकर यांनी स्विकारले. आभार आबासाहेब रणनवरे यांनी मानले. यावेळी पोलिस निरीक्षक विकास दिंडूरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.