अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करा

आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत उठविला आवाज
Devendra Kothe |
आमदार देवेंद्र कोठेPudhari File Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, टेक्स्टाईल पार्क, गोरक्षकांवर दाखल करण्यात येत असलेले खोटे गुन्हे, गणेश मूर्तीकारांच्या समस्या आदी विषयांवर आमदार देवेंद्र कोठे यांची अधिवेशनात लक्ष वेधले.

अनुकूल परिस्थिती असूनही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला हलवण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2016 मध्ये सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी 300 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यांचे काय झाले. चादर, टॉवेल, युनिफॉर्म गारमेंट याचा एकत्रित समावेश करून टेक्स्टाईल पार्क तयार केल्यास येथे उद्योगांना मोठा भाव मिळेल. केंद्राकडून जाहीर झालेल्या 30 टेक्स्टाईल पार्कपैकी तसेच राज्य शासनाच्या टेक्स्टाईल प्रकल्पातही सोलापूरला स्थान मिळाले नाही. सोलापुरातील वस्त्रोद्योगाला असलेले अनुकूल वातावरण आणि कामगारांचे कौशल्य लक्षात घेऊन सोलापुरात टेक्स्टाईल पार्क सुरू करावे, अशी मागणी केली. शहरात 18 हजार मूर्तिकार आहेत. पीओपीवरील बंदीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोरक्षणासाठी हवेत कायदे

सोलापूर शहर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्याने या जिल्ह्यात गोहत्येचे तसेच गोतस्करीचे प्रमाण मोठे आहे. गोरक्षक गोरक्षणासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर हल्ले होणे, खोटे गुन्हे दाखल होणे असे प्रकार होतात. त्यामुळे शासनाने गोरक्षणासाठी चांगले कायदे करावेत. हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आ. कोठे यांनी अधिवेशानत लावून धरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news