

सोलापूर : शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात सुमारे ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे शाळांकडून ही एसटीलाच पसंती मिळते. यंदाही सवलत कायम आहे. मात्र, ही सहल काढण्यापूर्वी शिक्षण विभागाचे निर्देश संबंधित शाळेला पाळावे लागतात. तरच त्यांना परवानगी मिळते. दुर्दैवाने अपघातसारखी एखादी घटना घडल्यास त्यानुसार जबाबदारी निश्चित केली जाते.
साधारपणे डिसेंबर महिन्यापासून शैक्षणिक सहली निघण्यास सुरुवात होते. एसटी महामंडळाने शालेय सहलीसाठी प्रवास भाड्यात घसघशीत ५० टक्के सवलत जाहीर केलेली आहे. ही सवलत यंदाही कायम ठेवण्यात आलेली आहे. गतवर्षी सहलीच्या माध्यमातून एसटीच्या उत्पन्नात बऱ्यापैकी भर पडली होती. यंदाही या सवलतीचा चांगला फायदा होईल, असे महामंडळाकडून सांगण्यात आले. दरम्यान, शिक्षण विभागाने सहल काढण्यासाठी शाळांना काही अटी दिल्या आहेत.
हिवाळा सुरू झाला की, शैक्षणिक सहली निघण्यास सुरुवात होते. यंदाही अनेक शाळांकडून सहलीचे नियोजन करण्यात येऊ लागले आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत कायम आहे. त्यामुळे शाळांकडून एसटी महामंडळाच्या बसलाच प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.
पालकांचे संमतीपत्र : शैक्षणिक सहल काढण्यापूर्वी संबंधित पाल्याच्या पालकांचे संमतीपत्र घेतले जाते. ते बंधनकारक आहे. शाळेकडून प्रत्येक विद्याथ्र्यांचे संमतीपत्र घेतले जाते. जे पालक संमतीपत्र देत नाहीत, त्यांच्या पाल्यांना सहलीसाठी नेले जाते.
शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी : सहलीच्या नियोजनापूर्वी संबंधित शाळेला शिक्षणाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. परवानगी नसेल तर सहल काढता येत नाही. शिक्षणाधिकारीही शाळेकडून सर्व अटींची पूर्तता झाली असेल तरच परवानगी दिली जाते.
शैक्षणिक सहल काढायचे झाले की, मुख्याध्यापकांच्या जबाबदारी वाढते. सर्वप्रथम त्यांना शिक्षणाधिकारी कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी घेताना अटींची पूर्तता करावीच लागते. परवानगी मिळाल्यानंतर महामंडळाकडून चालक उपलब्ध करून घेण्यापासून ते सुस्थितीतील बस मिळविण्यापर्यंत तपासणी करावी लागते.
एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात ५० टक्के सूट दिली आहे. त्यामुळे शाळा एसटीलाच पसंती देतात. खासगी बस अशा स्वरूपाची सूट देत नाहीत. सोबतच बसची अवस्था, सोयीसुविधांचा ही विचार केला जातो. शिक्षण विभागाने सहल काढण्यासाठी शाळांना काही अटी घालून दिल्या आहेत. या अटींची पूर्तता केल्याखेरीज सहलीस परवानगी दिली जात नाही. पालकांच्या सहमती घ्याव्या लागतात.
शैक्षणिक सहलीसाठी एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात ५० टक्के सूट दिली जाते. तसेच सुरक्षित प्रवासाची ही महामंडळ हमी देते. त्यामुळे जिल्हाभरातील शाळांनी शैक्षणिक सहलीसाठी सोलापूर विभागातील नऊ आगारातून एसटीची मागणी केल्यास त्वरित गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील.
अमोल गोंजारी, विभागीय नियंत्रक, सोलापूर