ST Bus: दीडशे कि.मी.मध्ये वाढणार एसटीची शटल सेवा

जिथे प्रवासी, तिथे अधिक फेऱ्या; लांब पल्ल्यांचे पुनर्नियोजन
ST Bus
ST Buspudhari photo
Published on
Updated on

सोलापूर : महामंडळाने प्रवाशांची संख्या व उत्पन्नांचा मेळ घालत एसटी महामंडळाने बस फेऱ्यांच्या नियोजनात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे अधिक प्रवासी, तिथे अधिक गाड्या या धोरणानुसार आता अल्प अंतराच्या शटल फेऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. १५० किलोमीटरच्या परिसरात ९५ टक्क्यांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

मात्र, या भागात प्रवाशांच्या तुलनेत फेऱ्यांची संख्या कमी होत आहेत. त्यामुळे प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गांवर एसटीची शटल सेवांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. लांब पल्ल्याच्या अनेक मार्गांवर प्रवासी संख्या तुलनेने कमी असतानाही अधिक बसेसच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे अशा मार्गांचे पुनरावलोकन करून प्रवाशांच्या संख्येनुसार फेऱ्यांचे नियोजन केली जाणार आहे. यामुळे उपलब्ध बसचे अधिक कार्यक्षम वापर करून उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. असा महामंडळाचा प्रयत्न आहे.

उत्पन्नवाढीसाठी चालक व वाहकांना रोख प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तसेच, एसटीला अन्य खासगी प्रवाशी वहातुकीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या नियोजनामुळे प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गांवर बससेवा अधिक उपलब्ध होण्याची शक्यता असून, एसटीच्या उत्पन्नात वाढ करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news