

दक्षिण सोलापूर : कर्नाटकच्या एसटी बसने रस्त्याकडेला उभ्या कंटेनरला मागून जोराची धडक दिल्यामुळे बसमधील 12 प्रवासी जखमी झाले.हा अपघात बोरामणी जवळ बुधवारी दुपारी झाला.
गावातील स्थानिक नागरिकांनी जखमींना सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कर्नाटकची बिदर ते पंढरपूर जाणारी एसटी बस (क्र. के ए एफ 12 12) ह्या बसने बोरामणी येथील शिवराम मंगल कार्यालयाजवळ रस्त्याच्याकडेला थांबलेल्या कंटेनरला (क्र.जी जे 12 बी झेड 73 90) याला मागून जोरदार धडक दिली. एसटीची डावी बाजू पूर्णपणे फाटत गेली. त्यामुळे डाव्या बाजूला बसलेले प्रवासी जखमी झाले. एसटीची अवस्था छिन्नविछिन्न झाली. याबाबत अद्याप जखमींचा नेमका आकडा आणि नावे कळू शकली नाही. काही जखमी हे सिव्हिल हॉस्पिटल, मार्कंडेय रुग्णालय तर काही यशोधरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत.
अपघात झालेले कळताच गावातील नागरिकांनी हैदराबाद- सोलापूर रस्त्यावर मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन इतर वाहनांना वाट मोकळी करून दिली.
अपघाताची माहिती गुलदत्त्यात
बसने कंटेनरला मागून धडक दिली. नेमका अपघात कशामूळे झाला. बसमध्ये तांत्रिक बिघाड कोणता होता हे समजू शकले नाही.