Pandharpur News : बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून संपविले जीवन

जवानाने टोकाचे पाऊल का उचलले , कारण अस्पष्ट
Pandharpur News
बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून संपविले जीवन
Published on
Updated on

पंढरपूर : वारीनिमित्त बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाने स्वत:वर बंदुकीच्या गोळ्या झाडून जीवनयात्रा संपवली. ही घटना आषाढी एकादशीदिवशी शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे पंढरीत हळहळ व्यक्त होत आहे. रामेश्वर ध्रुपद साबणे (वय ३०) असे जीवन संपवणाऱ्या एसआरपीएफ जवानाचे नाव आहे.

रामेश्वर साबणे हा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास, ज्या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सुरू होती, त्याच सुमारास पंढरपूर कासेगाव रोडवर नियुक्त ठिकाणी रामेश्वर याने स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडून हे टोकाचे पाऊल उचलले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात तैनात असलेल्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रामेश्वर साबणे याचा जागीच मृत्यू झाला. ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी हे टोकाचे पाऊल रामेस्वर साबणे यांनी का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news