Solapur Accident: भरधाव टेम्पोची ट्रकला मागून धडक; कर्नाटकातील 14 जखमी

सोलापूर ते मोहोळ मार्गावर भीषण अपघाताची घटना ; तीन लहान मुले, सहा महिलांचा जखमींमध्ये समावेश
Accident
Accident Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : मोहोळ ते सोलापूर या मार्गावरून आज रविवार रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास सोलापूरकडे जात असताना चारचाकी टेम्पोने समोरून जात असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या धडकेत टेम्पोमधील 14 जण जखमी झालेे आहेत. या अपघातातील सर्व जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व जखमी हे कर्नाटकातील आहेत. या अपघातात तीन लहान मुलांसह सहा महिलाही जखमी झालेले आहेत.

कर्नाटकातील काही जणांना घेऊन मोहोळवरून सोलापूरकडे निघालेल्या चारचाकी टेंपोने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून या अपघातात टेंपोतील 14 जण जखमी हे कर्नाटकातील बागेपल्ली कर्नाटकातील राहिवाशी आहेत.

मधु नारायण स्वामी (वय 32) रा. बागेपल्ली चिकबलपुरा, आदिया रेड्डी (5), प्रदीप आर. (22), गगनश्री ए. (20), रूपा नागभुषण (35), मुरली मोहन (44), लावण्या मधू (26), वेणुगोपाल लक्ष्मण रेड्डी (48), रंजिता रेड्डी (38), रोजी व्ही. (29), भौतिक रेड्डी (10), शोभा (45) रत्नम्मा (62), होशमित्ता (8) आदी जखमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news