

भंडारकवठे : सोलापूरच्या विभागीय आगारातून दक्षिण सोलापूरच्या सीना भीमा खोर्यातील विविघ गावांना धावणार्या एसटीचे वेळापत्रक कोलमडले आहे. याचा फटका भंडारकवठेसह विविध गावातील विद्यार्थी, नागरिक व महिला प्रवाशांना बसत आहे. बसचे कोडमडलेले वेळापत्रक सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
भंडारकवठे, तेलगाव-भीमा, माळकवठे, कुसूर, वडापूर, औराद, कंदलगाव यासह अन्य विविध गावांना जाणारे एसटीचे बसेसचे वेळापत्रक कोलमडले आहे. सकाळी सात वाजता शिक्षणासाठी घरा बाहेर विद्यार्थी पडतात.
शाळा, महाविद्यालय दुपारी एक ते दोन वाजता सुटते. दुपारी बस वेळेवर येत नसल्याने सात रस्ता, नेहरू नगर, सैफुल, सोरेगाव, मंद्रुप, निंबर्गी, बसवगर यासह अन्य गावातील बसस्थानकावर विद्यार्थी दुपारी चार व काही वेळेला पाच वाजे पर्यंत ताटकळत बसतात. घरी पालक काळजी करीत बसतात. वरील गावांना धावणार्या बसेस ह्या वेळेवर सोडण्यासाठी आगार प्रशासनाकडून प्रयत्न करावा, अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रवाशांतून होताना दिसत आहे.