Solapur News : झेडपी विषय समिती सदस्यांची निवड बिनविरोध

79 सदस्यांना 83 जागांवर संधी; स्थायी समित्यांवर भाजपचे वर्चस्व
Solapur ZP |
झेडपी विषय समिती सदस्यांची निवड बिनविरोधPudhari File Photo
Published on
Updated on

सोलापूर ः जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीनंतर विषय समिती सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. जिल्हा परिषदेचे 68 सदस्य आणि पंचायत समितीच्या अकरा सभापती असे एकूण 79 सदस्यांची 83 जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या उपस्थितीत डेप्युटी सीईओ (प्रशासन) स्मिता पाटील यांनी विषय समिती सदस्यांची निवड बुधवारी (दि. 15) यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रक्रिया पार पडली. यावेळी सभापती चेतनसिंह केदार, रामप्पा चिवडशेट्टी, संस्कृती सातपुते, अमृता वाघे, सीईओ कुलदीप जंगम, अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर उपस्थित होते. विषय समिती सदस्यांसाठी 83 अर्ज आले होते. कोणत्याही सदस्यांनी अर्ज माघारी घेतला नाही. त्यामुळे निवड प्रमुख पाटील यांनी विषय समित्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

तब्बल दीड तास सभा तहकूब कशी?

विषय समिती सदस्यांची निवडीची सभा दोन वाजता होणारी होती; मात्र निवडीसाठी सदस्य संख्याबळ नसल्याने प्रशासनाने सभा दीड तास तहकूब केली. मात्र, ती सभा फक्त दहा ते पंधरा मिनिटे तहकूब करता येते. त्यामुळे सभा दीड तास कशी तहकूब केली, अशी शंका माजी जिल्हा परिषद सदस्यांतून व्यक्त केली जात आहे.

सर्व सदस्यांना निधी देणार ः अध्यक्ष वैद्य

सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करणार असून, सर्वांना निधी देणार आहे. त्यामुळे कुणीही निधी मिळणार नाही, अशा भ्रमात राहू नये. सदस्य कोणत्याही पक्षाचा असो त्याला समान निधी देण्यात येणार असल्याचे आश्वासन अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिले.

स्थायी समित्यांवर भाजपचे 7 सदस्य

विषय समित्यांमध्ये विविध समित्या आहेत; मात्र महत्त्वाच्या स्थायी समित्यांवर भाजपने सात सदस्यांना, तर शिंदे शिवसेनेच्या एका सदस्याला संधी दिली. त्यामुळे स्थायी समित्यांवर भाजपचे वर्चस्व दिसत आहे. यामध्ये पृथ्वीराज माने, शांभवी कल्याणशेट्टी, अदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे, सविता उंबरजे, रमेश भांजे हे भाजपचे, तर दादासाहेब लवटे या शिवसेनेच्या सदस्याला संधी मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news