Solapur ZP: जि. प. अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य

उपाध्यक्षपदी इंद्रजित पवार; भाजपची एकहाती सत्ता
Solapur ZP
Solapur ZP: जि. प. अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्यPudhari
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गटातून विजयी झालेले दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून विजयी झालेले इंद्रजित पवार यांची बिनविरोध निवड झाली.

बुधवारी (दि.18) जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी बार्शीचे वैद्य आणि उपाध्यक्ष पदासाठी उत्तर सोलापूर तालुक्याचे पवार यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले. अर्ज माघार घेण्याच्या वेळी दोघांनी एक, एक अर्ज मागे घेतला. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी केवळ त्या दोघांचेच अर्ज राहिल्याने वैद्य यांची अध्यक्ष तर पवार यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध झाली.

दरम्यान, सकाळी 11 वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य बालाजी नरोटे, नेताजी खंडागळे आणि विकास बुळा यांनी जिल्हा परिषदेत येऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज नेले होते. दुसऱ्या बाजूला हॉटेल बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या 38 सदस्यांची बैठक झाली.

यावेळी दीपक वैद्य अध्यक्ष तर इंद्रजीत पवार यांची उपाध्यक्ष पदासाठी नावे निश्चित करण्यात आली. त्यानंतर सर्व नेते जिल्हा परिषदेत दाखल झाले. नावे निश्चित झालेल्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. इतर कोणीही अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज न भरल्याने अध्यक्षपदी वैद्य, उपाध्यक्षपदी पवार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा उपजिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी संतोष देशमुख यांनी जाहीर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news