Solapur ZP: तपासणीविनाच चौकशी समिती गेली परत

जिल्‍हा परिषद : तत्‍कालीन जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी गैरकारभार प्रकरण
Solapur ZP
Solapur ZPPudhari
Published on
Updated on

सोलापूर : जिल्‍हा परिषदेचे तत्‍कालीन प्रभारी जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी सचिन कवले यांनी केलेल्‍या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी पुणे येथील प्रादेशिक उपायुक्‍त कार्यालयातील समिती जिल्‍हा परिषदेत सोमवारी (दि.२२) दाखल झाली होती. मात्र, तपासणीसाठी लागणारे कागदपत्रच गायब असण्याच्‍या कारणाने तपासणीविनाच चौकशी समिती परत गेल्‍याची माहिती समोर आली आहे.

कवले यांच्‍याकडे ८ ऑक्‍टोबर २०२४ ते ६ मे २०२५ या दरम्‍यान जिल्‍हा परिषदेच्‍या समाजकल्‍याण विभागाचा अतिरिक्‍त पदभार होता. या कालावधीत त्‍यांनी बेकायदेशीर आणि भ्रष्ट कारभार केल्‍याची तक्रार दिव्‍यांग शिक्षक भारती संघटनेचे जिल्‍हाध्यक्ष दीपक मुठाळ यांनी प्रादेशिक उपायुक्‍त कार्यालयाकडे केली होती. त्‍यामुळे चौकशीसाठी तीन जणांचे पथक दाखल झाले होते. मात्र, त्‍यांना त्‍या काळातील कागदपत्रे न मिळाल्‍याने चौकशी समिती परत गेली असून, पुन्‍हा या प्रकरणाची चौकशी होणार की नाही, याकडे जिल्‍ह्याचे लक्ष लागले आहे.

दोन्‍ही प्रभारी अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट

चौकशी समितीला कागदपत्रे न मिळाल्‍याने ती परत गेली आहे. चौकशीला लागणारे कागदपत्रे गायब झाल्‍याची माहिती समोर आली असून, त्‍या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार, याविषयी प्रतिक्रिया विचारण्यासाठी प्रभारी दिव्‍यांग कल्‍याण सक्षमीकरण अधिकारी सुलभा वठारे आणि प्रभारी जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्‍यांशी संपर्क साधला असता, दोघांनी माझ्याकडे हा विषय येत नाही, असे सांगत त्यांनी जबाबदारी झटकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news