Solapur ZP : झेडपीत पाचजणांना स्वीकृत सदस्यपदी संधीची शक्यता

महसूलमंत्री बावनकुळेंकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव
Solapur ZP
Solapur ZP Pudhari
Published on
Updated on
अमोल साळुंके

सोलापूर : जिल्हा परिषदेत पाच, पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य घेण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. तसा प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे. त्या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत पाच, पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करावी, अशी मागणी महसूलमंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्या मागणीला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे हेही सकारात्मक असून, अधिनियमात बदल व्हावा, यासाठी ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या 68 जागापैकी भाजपाचे 38 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे स्वीकृत सदस्यांची नेमणूक केल्यास भाजपाच्या आणखी काही कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेत येण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पालकमंत्री गोरे हे जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करत आहेत.

भाजपाला मिळणार फायदा

जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांची नेमणूक करण्यासाठी अधिनियमात सुधारणा झाल्याने भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांना थेट जिल्हा परिषदेत प्रवेश मिळणार आहे. जिल्हा परिषदेत भाजपाचे सर्वाधिक 38 उमेदवार निवडून आले आहेत. त्याखालोखाल दोन्ही राष्ट्रवादी मिळून 16, शिंदे शिवसेनेचे आठ जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे त्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांची नेमणूक करण्याचा कोणताही आदेश शासनाकडून आला नाही. त्यामुळे स्वीकृत सदस्य म्हणून कोणाचेही नेमणूक करण्यात येणार नाही. मात्र, शासनाकडून स्वीकृत सदस्यांचे पत्र असल्यास राजकीय बलाबल बघून शासनाच्या आदेशानुसार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाईल.
- स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news