

सोलापूर : यशवंत पंचायत राज अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा क्रमांक मिळवत 17 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. तर पंढरपूर पंचायत समितीने पुणे विभागात द्वितीय पुरस्कार पटकावत आठ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंगळवारी (दि. 6) यशवंत पंचायत राज अभियानाच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. 2022-23 या कालावधीत झालेल्या पंचायत राज प्रशासनातील कामाचे मूल्यमापन करून या पुरस्काराची घोषणा केली आहे. याबद्दल ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर, कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.
दिलीप स्वामी यांनी विशेष लक्ष दिले होते. या कालावधीत सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी म्हणून इशाधिन शेळकंदे, विद्यमान उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी काम पाहिले आहे. राज्य स्तरावर वर्धा जिल्हा परिषदेने ने प्रथम (30 लाख ), अमरावती जिल्हा परिषदेने द्वितीय (20 लाख) तर सोलापूर जिल्हा परिषदेने तृतीय पुरस्कार ( 17 लाख) पटाकाविला आहे.