

सोलापूर : पवित्र पोर्टल भरतीच्या रुपांतरित जागेतून सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेला ७५ शिक्षक मिळाले आहेत. त्यांच्या कागदपत्रांची आज शुक्रवारी (दि.१६) पडताळणी होणार आहे. त्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नवनियुक्त उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून त्यांना शाळा निवड करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याअगोदर सोलापूर जिल्ह्यात जवळपास ३०० पेक्षा जास्त उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आता मात्र रूपांतरित जागेतून सोलापूर जिल्हा परिषदेला १५१ जागा उपलब्ध होते. मात्र, त्यातील ७५ उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित उमेदवारांना केव्हा बोलविणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
वेळेवर उपस्थित रहा
शहरातील नेहरु मुलांचे वसतिगृहात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्या शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
जात संवर्गनिहाय जागा
l अनु. जमाती - ३ l अनु. जाती - ०७
l ओबीसी - १२ l एसईबीसी - १५
l ईडब्ल्यूएस - ०६ l खुला - ३२