Solapur ZP: झेडपी विषय समितीच्या सभापती निवडी जाहीर

सोलापूर जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या
Solapur ZP
Solapur ZP Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. माळशिरसचे माजी आ. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांची समाज कल्याण समिती सभापतिपदी निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील यांना शह देण्याची खेळी भाजपने खेळली आहे. सातपुते या दहिगाव गटातून निवडून आल्या आहेत.

कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतिपदी रामप्पा चिवडशेट्टी यांची निवड करण्यात आली. ते होटगी जिल्हा परिषद गटातून निवडून आले आहेत. आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. सुभाष देशमुख यांच्याशी समान अंतर ठेवून त्यांनी सभापतिपद मिळविले. महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी टेंभुर्णी गटातून विजयी झालेल्या ॲड. अमृता नागनाथ वाघे यांची निवड करण्यात आली. वाघे यांच्या रूपाने माजी आ. बबनदादा शिंदे गटाला संधी मिळाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्ह्याचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतिपदी वर्णी लागली आहे. त्यांना दुसऱ्यांदा सभापतिपदाची संधी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्याकडे अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या निवडीसाठी शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलविली होती. चार विषय समिती सभापती पदासाठी पिठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अर्ज भरले. चार पदांसाठी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यानंतर दुपारी अडीच वाजता बिनविरोध निवडी झाल्याच्या घोषणा करण्यात आली.

उपाध्यक्ष इंद्रजित पवार - ‌‘अर्थ व बांधकाम‌’

संस्कृती सातपुते - ‌‘समाजकल्याण‌’

रामप्पा चिवडशेट्टी - ‌‘कृषी व पशुसंवर्धन‌’

ॲड. अमृता वाघे- ‌‘महिला व बालकल्याण‌’

चेतनसिंह केदार सावंत - ‌‘शिक्षण व आरोग्य‌’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news