Solapur News : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड

कोणाची लागणार वर्णी; निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष
Solapur News
सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले आहे. दरम्यान बुधवारी (दि. 18)अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड होणार असून अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या प्रवर्गातून भाजपकडून चार महिला आणि चार पुरुष सदस्य निवडून आले आहेत. त्यातील एका सदस्याला अध्यक्षपदाची लॉटरी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकृती तर दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात होणार आहे. यावेळी उमेदवारी अर्जांची छाननी करून अधिकृत उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. दुपारी 2.15 ते 2.30 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

दुपारच्या सत्रात उपाध्यक्षांची होणार निवड

दुपारी तीन वाजता उपाध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाईल. दुपारी 3.10 ते 3. 25 या वेळेत अर्ज मागे घेण्याची मुदत राहणार आहे. त्यानंतर दुपारी 3.25 नंतर उपाध्यक्ष निवडीसाठी कामकाज सुरु करुन उपाध्यक्ष जाहीर करण्यात येणार आहे.

कागदपत्रे बंधनकारक

अध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांमध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र (किंवा प्रस्ताव सादर केल्याची पावती) तसेच आधारकार्ड सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सोबत कागदपत्रे घेऊन यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

वैद्य, कांबळे की धक्कातंत्राने चिवडशेट्टी?

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी बार्शी तालुक्यातील उपळाई (ठोंगे) गटातून निवडून आलेले व माजी आ. राजेंद्र राऊत यांचे समर्थक दीपक वैद्य तर माढा तालुक्यातील मोडनिंब गटातून निवडून आलेल्या माजी आ. बबनदादा शिंदे यांच्या समर्थक वंदना शिवाजी कांबळे या दोघांपैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे. याबरोबरच दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गटातील रामप्पा चिवडशेट्टी यांची अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांच्यासह माजी आ. दिलीप माने आग्रही आहेत. त्यामुळे पक्षाच्ा वरिष्ठ नेत्यांकडून धक्कातंत्राचा वापर झाल्यास चिवडशेट्टी यांचीही वर्णी लागू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news