

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे तरुणाचा अज्ञात कारणावरून डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली.
लक्ष्मण वसंत वाघमारे (वय 25, रा. वळसंग) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित आरोपी रवी पुटगे (रा. वळसंग, ता. दक्षिण सोलापूर) हा स्वतःहून वळसंग पोलिस ठाण्यात हजर झाला. घटनेची खबर कळताच अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी घटनास्थळी भेट दिली. मयताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयास पाठवून देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेचा अधिक तपास वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे हे करीत आहेत.