Solapur Youth Festival: विविध महाविद्यालयातून वाढू लागला युथ फेस्टिव्हलचा फिवर

बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयात रंगणार युवा महोत्सव, ‘संगमेश्वर’ची जय्यत तयारी
Solapur Youth Festival: विविध महाविद्यालयातून वाढू लागला युथ फेस्टिव्हलचा फिवर
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव २८ सप्टेंबरला बार्शी येथे रंगणार आहे. काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने विविध महाविद्यालयांमध्ये तयारीला वेग आला आहे. अनेक विद्यार्थी या कलाविश्वात रंगून गेल्याचे चित्र विविध महाविद्यालयात आहे.

युवा महोत्सवात बाजी मारण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातून जोरदार तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सराव सुरू आहे. यंदाच्या महोत्सवात ३९ कला प्रकारांमध्ये ४० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांना सरावासाठी आवश्यक जागा, साहित्य तसेच मार्गदर्शनासाठी प्रशिक्षक आणि कोरिओग्राफरची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक कला प्रकारातील सादरीकरण अधिक प्रभावी व्हावे, यासाठी विद्यार्थी आणि मार्गदर्शकांकडून विशेष मेहनत घेतली जात आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कॉलेज परिसरातही उत्साहाचे वातावरण आहे.

येथील संगमेश्वर कॉलेजला गेल्या काही वर्षांपासून विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे यंदा विजेतेपद मिळविण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू आहे. सरावातील बारकावे, सादरीकरणातील अचूकता आणि सांघिक समन्वयावर विशेष भर देण्यात येत आहे.

युवा महोत्सवात सहभागी होण्याची ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. विजेतेपद मिळविण्यासाठी आम्ही दररोज नियमित सराव करत आहोत. सकाळपासून रात्रीपर्यंत सराव करताना थकवा जाणवतो. मात्र महोत्सवात उत्तम सादरीकरण करण्याची जिद्द असल्याने उत्साह कायम आहे.
- गौरी बायस, विद्यार्थिनी, वालचंद महा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news