Solapur drowning incident: बुडणाऱ्या मित्राला वाचवताना युवकाचा मृत्यू

पानीव येथील नीरा उजवा कालव्यातील घटना
Drowning death
Drowning deathPudhari
Published on
Updated on

पानीव : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या पानीव (ता. माळशिरस) येथील युवकाचा नीरा उजवा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आकाश सतीश मदने (वय 22) असे मृत युवकाचे नाव आहे. बुडणाऱ्या मित्राला वाचवताना त्याने स्वतःचा जीव गमावला.

आकाश मदने व त्याचे चार मित्र बुधवारी (दि. 6) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निकमवाडी येथील नीरा उजवा कालवा येथे पोहण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्यापैकी एक जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात बुडू लागला. प्रसंगावधान राखत आकाशने तत्काळ पाण्यात उडी घेत मित्राला सुरक्षितपणे तटावर आणले. मात्र, स्वतः दमल्यामुळे तो पाण्यात बुडाला. ही घटना लक्षात येताच पानीव परिसरातील तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबविली. मात्र, आकाशचा शोध लागला नाही.

अखेर गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान 77 चौकी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. आकाशच्या दुर्दैवी निधनामुळे पानीव गावावर शोककळा पसरली आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिस भरतीचे स्वप्न अधुरे

आकाशचे वडील सतीश मदने यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले होते. आकाश हा पदवी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. तो पोलिस भरतीचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून नियमित व्यायाम व तयारी करत होता. मात्र, काळाने घाला घालत कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आणि एका जिद्दी युवकाची स्वप्ने कायमची अधुरी राहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news