Gorakhgad Fort Accident: पाय घसरल्याने दरीत कोसळून सोलापुरच्या तरुणाचा मृत्यू

ट्रेकिंग दरम्यान मृत्यू
Gorakhgad Fort Accident
Gorakhgad Fort Accident: पाय घसरल्याने दरीत कोसळून सोलापुरच्या तरुणाचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

मुरबाड शहर : मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध ऐतिहासिक गोरखगड येथे मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या सोलापूर येथील 24 वर्षीय ऋषिकेश राजेंद्र जाधव या तरुणाचा ट्रेकिंग दरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली असून रेस्क्यू टीमच्या साहाय्याने रात्री उशिरा मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले.

गडावरून खाली उतरत असताना पाय घसरल्याने अंदाजे शंभर ते सव्वाशे फूट निसरड्या खोल दरीत पडल्याने ऋषिकेश याला गंभीर दुखापती झाली व त्यातच त्याचा वेदनादायी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. प्राप्त माहितीवरून, ऋषिकेश राजेंद्र जाधव हा नवी मुंबई येथे आपल्या मामाकडे आला असता मित्रांसोबत तो गोरखगडावर फिरण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. पायातील बुटांना अपेक्षित ग्रीप न मिळाल्याने व रस्ता चिकट झाल्याने त्याचा तोल जाऊन तो पडल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, नुकताच जून महिन्यात गोरखगडपासून काही अंतरावर असणार्‍या सिद्धगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या 14 पर्यटकांपैकी 22 वर्षीय साईराज धनेश चव्हाण नामक एक 22 वर्षीय तरुण बेपत्ता झाला होता. रेस्क्यू टीम डेल्ला, साह्यगिरी, हेल्प, वाइल्ड इंडिया 05 यांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरु असताना तिसर्‍या दिवशी त्याचा मृतदेह काढण्यात यश आले होते.

पर्यटन सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न...

या सततच्या घटनांमुळे मुरबाड तालुक्याच्या पर्यटनाला गालबोट लागत असून पर्यटनासाठी कोट्यवधीचा निधी खर्ची लागलेल्या मुरबाडमधील पर्यटन सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news