Solapur Youth Congress Protest: युवक काँग्रेसचे भाजपविरोधात थाळी वाजवा आंदोलन

काँग्रेस कार्यकर्ते-पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक
Solapur Youth Congress Protest: युवक काँग्रेसचे भाजपविरोधात थाळी वाजवा आंदोलन
Published on
Updated on

सोलापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढ, परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर युवक काँग्रेसने रविवरी भाजप सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले.

भाजप कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी थाळी वाजवा आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी सरकारवर टीका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news