Solapur murder case: निंबर्गीत लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

झोपेत असताना जात्याच्या दगडाने डोके ठेचले
Murder
Murder Pudhari
Published on
Updated on

दक्षिण सोलापूर : निंबर्गी येथे पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या भावाने लहान भावाला कुऱ्हाडीने वार करून जखमी केले होते. शनिवार पहाटे साडेचार वाजता मोठ्या भावाचा लहान भावाने झोपेत असताना जात्याच्या दगडाने डोके ठेचून खून केला.

रेवणसिद्ध ऊर्फ महांतेश सूर्यकांत ऐवळे (वय 45, रा निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या खूनप्रकरणी आरोपी लहान भाऊ संतोष सूर्यकांत ऐवळे (36) याला मंद्रुप पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली. मंद्रुप पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी संतोष ऐवळे व त्याचा भाऊ मृत रेवणसिद्ध या दोघांना दारूचे व्यसन होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news