Solapur News: अत्यवस्थ महिलेचा अखेर मृत्यू

एसबी प्लाझा इमारतीमधील दूषित पाण्याने घेतला बळी
Woman dies
Woman diesPudhari
Published on
Updated on

सोलापूर : आसरा परिसरातील एसबी प्लाझा या इमारतीमध्ये दूषित पाणीपुरवठा झाल्याने येथील ४० जण शहरातील विविध रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. त्यातील एका महिलेच्या अखेर उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला.

आफरीन मुजफ्फर शेख (४९) असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्यावर यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दूषित पाणी पिल्यामुळे त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास मागील तीन दिवसापासून होत होता. याच कारणाने त्यांचा मृत्यू झाला आहे अशी नोंद त्यांच्या डिस्चार्ज कार्डमध्ये आहे.

या इमारतीमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशा तक्रारी नागरिकांनी अनेक वेळेस केल्या होत्या. पण याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच हा बळी गेल्याचेे नागरिकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news