Solapur jewellery theft: ज्वेलर्समधून महिला कामगाराने लांबविले 11 लाखांचे दागिने

गणेश रामचंद्र आपटे ज्वेलर्समधून महिला कामगाराने 11 लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली
gold theft
gold theftPudhari
Published on
Updated on

सोलापूर : येथील गणेश रामचंद्र आपटे ज्वेलर्समधून महिला कामगाराने 11 लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली. पदम्मा जगन्नाथ साळुंखे (वय 45, रा. राजेश्वरी नगर, बाळे), दागिने चोरलेल्या महिलेचे नाव आहे.

पदम्मा साळंखे या आपटे ज्वेलर्सच्या सोने विभागात कामाला आहेत. फेब्रुवारी व मार्च 2026 मध्ये ग्राहकांनी दुकानात मोडीस आणलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 10 लाख 82 हजार रुपये किंमतचे 74.41 ग्रॅमचे दागिने तिने चोरुन नेले.

ही बाब समजताच ज्वेलर्सचे चिफ अकौंटंट पंकज रमाकांत जाधव यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पदम्मा साळुंखे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक महाडिक करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news